आयपीएलचे पुण्यात होणारे प्लेऑफचे दोन सामने बीसीसीआयने कोलकात्याला हलवले आहेत. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली आहे. आयपीएलच्या प्लेऑफ गटातील एलिमिनेटर आणि क्वालिफायर २ हे २३ आणि २५ मे रोजी होणारे प्लेऑफचे दोन सामने पुण्यात होणार होते. पण हे सामने आता ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्लेऑफ फेरीतील क्वालिफायर १ च्या सामन्याच्या स्थळामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून हा सामना मुंबईतच वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. पुणे हे चेन्नई सुपर किंग्जचे होम ग्राऊंड आहे. खरंतर चेन्नई सीएसकेचे होम ग्राऊंड आहे पण सुरक्षेच्या कारणास्तव तामिळनाडूमधून आयपीएलचे सामने पुण्यात हलवण्यात आले.

नियमानुसार मागच्या मोसमातील आयपीएलमधला जो उपविजेता संघ आहे त्यांच्या होम ग्राऊंडवर हे सामने झाले पाहिजेत. मागच्यावर्षी पुणे सुपरजायंट संघ उपविजेता ठरला होता. पण आता पुण्याचा संघ आयपीएलमध्ये नाहीय. तामिळनाडूत कावेरी पाणी वाटपाच्या वादातून आयपीएल सामन्यांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे सीएसकेचे चेन्नईमधील उर्वरित सहा सामने पुण्यात हलवण्यात आले. प्लेऑफ सामने आयोजित करायला आम्हाला निश्चित आवडेल असे बंगाल क्रिकेट असोशिएशनचे संयुक्त सचिव अविषेक दालमिया यांनी सांगितले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl pune play off match cancel
First published on: 05-05-2018 at 07:24 IST