पुणे : निवृत्तिवेतन लाभ हा खरे तर निवृत्तांना सतत उत्पन्न आणि निर्धोक जीवनाची खात्री देतो. पण सध्या शासकीय आणि काही संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित असलेला हा लाभ, सर्वांनाच मिळविता येणे शक्य आहे. आपल्या निवृत्तीची तरतूद आपणच करण्याचे मार्ग आणि नियोजनाची मांडणी येत्या शनिवारी ‘लोकसत्ता अर्थभान’च्या विशेष सत्रातून केली जाणार आहे.

कमावत्या वयातच आयुष्यासाठी ठरविलेल्या आर्थिक लक्ष्यांना गाठता येऊ शकते. म्हणूनच याच वयात सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनाची काळजी घेणारे नियोजन आणि गुंतवणुकीची दिशाही ठरायला हवी. त्या अंगाने तरुण पगारदारांसाठी दिशादर्शक ‘लोकसत्ता अर्थभान’च्या या सत्राचे आयोजन मुख्य प्रायोजक ‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडा’च्या सहयोगाने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवारी, सायंकाळी ५.३० वाजता, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामागे, लोखंडे सभागृहाजवळ, पिंपरी येथे होत आहे.

हेही वाचा >>>तलाठी भरती परीक्षेत घोळ : प्रश्नपत्रिकांमध्ये तब्बल ११४ चुका…उमेदवारांसाठी भूमी अभिलेख खात्याचा मोठा निर्णय

आर्थिक स्वयंनिर्भरता ही उत्पन्नातून खर्च वजा जाता राहणाऱ्या थोड्याथोडक्या का होईना, पण नियमित बचत आणि गुंतवणुकीतून शक्य आहे. याची उकल गुंतवणूक विश्लेषक वीरेंद्र ताटके आणि कर सल्लागार दिलीप सातभाई हे या कार्यक्रमातून करतील. उपस्थित गुंतवणूक-उत्सुकांना या तज्ज्ञांना या निमित्ताने थेट प्रश्नही विचारता येतील.

श्रीमंत निवृत्तीसाठी काय कराल?

* कधी : शनिवार, ९ डिसेंबर २०२३

* केव्हा : सायंकाळी ५.३० वाजता

* कुठे : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामागे, लोखंडे सभागृहाजवळ, पिंपरी

* वक्ते : वीरेंद्र ताटके (गुंतवणूक विश्लेषक)

* विषय : गुंतवणुकीद्वारे अर्थनियोजन

* वक्ते : दिलीप सातभाई (कर सल्लागार)

* विषय : निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी तरतूद

कार्यक्रमास उपस्थित राहण्यास इच्छुक असलेल्या वाचकांनी लोकसत्ता कार्यालयात दूरध्वनी ०२०-६७२४११२४ या क्रमांकावर सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते. योजनेसंबंधी सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.