पुणे : लोणावळ्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून नागरिकांना अक्षरशः झोडपून काढले आहे. गेल्या २४ तासात लोणावळा शहरात तब्बल १६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलै महिना सुरू होताच जोरदार आगमन केले आहे. लोणावळ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमीच आहे. यावर्षी एकूण ५८१ मिमी पाऊस झाला आहे तर गेल्या वर्षी आजच्या दिवशी तब्बल १ हजार १०५ मिमी पाऊस झाला होता. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोणावळा शहर, परिसराकडे पर्यटन नगरी म्हणून पाहिलं जातं. भुशी धरण, सह्याद्रीच्या डोंगर- दऱ्यांमधून वाहणारे धबधबे हे अनुभवण्यासाठी, मक्याचं कणीस, भजी याचा आस्वाद घेण्यासाठी पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवडसह देशभरातून नागरिक लोणावळ्यात दाखल होत असतात. पावसाचा जोर वाढला असल्याने पर्यटकांचा ओघ लोणावळ्यात वाढला आहे. 

पाहा व्हिडीओ –

टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट येथे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. यामुळं लोणावळा शहर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. गेली दोन वर्षे करोनामुळे पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. गेल्या वर्षी देखील तोच नियम लागू करण्यात आला. मात्र, करोना च प्रमाण कमी झाल्याने नियम झुगारून पर्यटक लोणावळ्यात, भुशी धरण, येथे दाखल व्हायचे. तेथील व्यवसायकांचा पोट याच पर्यटकांवर अवलंबून आहे. गेल्या दोन वर्षात त्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. यावर्षी करोना आटोक्यात आला असून निर्बंध नाहीत त्यामुळं पर्यटक आणि व्यवसायिक दोघे ही आनंदी आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lonavala waterfalls mountain valley tourists crowd increasing kjp 91 ysh
First published on: 06-07-2022 at 13:13 IST