लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी फळांची आवक कमी झाली. त्यामुळे डाळिंब, लिंबांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले.

सध्या सुरू असलेल्या श्रावण मासामुळे उपवास केले जात असल्याने फळांना विशेष मागणी असते. मात्र मागणी असूनही फळांची आवक कमी झाली आहे. लिंबांच्या गोणीमागे १०० रुपयांनी वाढ झाली. डाळिंबाच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाली. कलिंगड, खरबूज, पपई, सीताफळाच्या दरात वाढ झाली आहे. अन्य फळांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

आणखी वाचा-पुणे : घाऊक बाजारात फळभाज्यांचे दर स्थिर; लसणाच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केरळ येथून ५ ट्रक अननस, मोसंबी ५० ते ६० टन, डाळिंब २५ ते ३० टन, पपई ४ ते ५ टेम्पो, लिंबे ७०० ते एक हजार गोणी, कलिंगड ५ ते ६ टेम्पो, खरबूज ५ टेम्पो, पेरू एक हजार प्लास्टिक जाळी (क्रेट्स), सीताफळ २० ते ३० टन, चिकू एक हजार खोकी, तसेच सफरचंद २ ते ३ हजार पेट्यांची आवक झाली.