पुणे : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळातर्फे पाचवी आणि आठवीसाठीची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार १५ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे सचिव माणिक बांगर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अखत्यारित महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ कार्यरत आहे. या मंडळातर्फे पाचवी, आठवीला प्रवेश दिले जातात. शाळा संपर्क केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापनही केले जाते.

हेही वाचा : पार्थच्या पराभवाची माझ्या मनात चीड; मावळमधून एक लाख ७२ हजारांच्या मताधिक्याने जिंकणार- संजोग वाघेरे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया मंडळाने सुरू केली आहे. त्यानुसार नव्याने नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ५ ते १८ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, शुल्क, कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत जमा करावी लागतील. २४ जूनला संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, शुल्क, मूळ कागदपत्रे आणि यादी विभागीय मंडळात जमा करायची आहे. अधिक माहिती https://msbos.mh-ssc.ac.in/ या संकेतस्थळावर देण्यात आल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.