पुणे : मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी वादग्रस्त प्रशिक्षाणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांच्या जामिनावर सरकारी पक्ष, मूळ फिर्यादी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. शुक्रवारी (२ ऑगस्ट) त्यांच्या जामिनावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

सत्र न्यायाधीश अजित मरे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. बचाव पक्षातर्फे ॲड. सुधीर शहा, सरकारी पक्षातर्फे ॲड. कुंडलिक चौरे आणि मूळ फिर्यादीच्या वतीने ॲड. अमेय बलकवडे यांनी बाजू मांडली. प्रत्यक्ष गोळीबार झालेला नाही. त्यामुळे खुनाच्या प्रयत्नाचे कलम लागू होत नाही. तिच्याकडे पिस्तुलाचा परवाना आहे. त्यामुळे आर्म ॲक्ट लागू होत नाही. मनोरमा खेडकर यांनी स्वरक्षणासाठी पिस्तूल वापरले आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे ॲड. सुधीर शहा यांनी केला.

हेही वाचा – VIDEO : पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी गेट पडून साडेतीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

हेही वाचा – राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ चित्रीकरणावरून त्यांनी स्वरक्षणासाठी ते वापरले असे दिसून येत नाही. व्हिडीओ जुना असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, व्हिडीओ खरा असल्याचे त्यांच्याकडून कबूल करण्यात येत आहे. न्यायालयीन वाद सुरू असताना जागेच्या ताब्यासाठी त्यांनी हे कृत्य केले आहे. कानपट्टीवर पिस्तूल ठेवून गोळी झाडणार होते. मात्र, लोकांनी ओढले, म्हणून वाचलो. अन्यथा तेथेच मृत्यू झाला असता. घटनेच्या वेळी उपस्थित असलेले तिचे अंगरक्षक अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घ्यायचा आहे. मोबाइल जप्त करायचा आहे. वादग्रस्त असलेली त्यांची मुलगी पूजा खेडकर फरार आहे. त्यांच्याकडून पुराव्यामध्ये छेडछाड केली जाऊ शकते. त्यामुळे जामीन फेटाळण्याची मागणी मूळ फिर्यादीचे वकील ॲड. अमेय बलकवडे यांनी केली.