पुणे : राज्यात यंदा मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी; तसेच खंडित वृष्टी होईल, असा अंदाज कृषी-हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. कमाल तापमान, सकाळ, दुपारची सापेक्ष आद्र्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी आदी माहितीच्या विविध पंधरा प्रारूपांद्वारे विश्लेषण करून हा अंदाज मांडण्यात आला असल्याचे डॉ. साबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले,की यंदा मोसमी पाऊस उशिराने म्हणजे दहा जून रोजी राज्यात दाखल होईल. त्यानंतरही सलग पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. जूनपासून सप्टेंबपर्यंत सलग पाऊस पडण्याची शक्यता कमी असून, राज्यभरात खंडित वृष्टी होण्याची शक्यता आहे. धुळे, जळगाव, राहुरी, कराड, अकोला, पाडेगाव, शिंदेवाही (चंद्रपूर) परिसरात पावसात खंड पडण्याचा अंदाज आहे. दापोली, पुणे, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, निफाड, सोलापूर, परभणी परिसरात पावसातील खंड कमी असेल. कमी दिवसांत अधिक पाऊस, अशी स्थिती राहणार आहे.

Pune Division, 21 thousand Crore, Rs 16 thousand Crore, District Level Investment Conference, maharashtra government
गुंतवणुकीत पुणे १ नंबर! पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना टाकले मागे
pune, Sassoon Hospital, Superintendent Appointment, Controversy, Dr Yallappa Jadhav, Letter to Minister, Seeks Change
‘या’ पदासाठी मीच पात्र! अधिकारीच जेव्हा थेट मंत्र्यांना पत्र लिहितो तेव्हा…
Entrance Exam for BBA BMS BCA Courses Conducted by CET Cell Pune
बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा ; येत्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशांसाठी सीईटी सेलकडून अंमलबजावणी
The pune Municipal Corporation warns that if water is misused the tap will be cut off Pune news
पिंपरी : पाण्याचा गैरवापर केल्यास नळजोड खंडित करणार; महापालिकेचा इशारा

पश्चिम विदर्भात ९३ टक्के, पूर्व आणि मध्य विदर्भात १०० टक्के, मराठवाडय़ात ९३ टक्के, कोकणात ९४ टक्के, उत्तर महाराष्ट्रातील निफाड परिसरात ९८ टक्के, धुळे आणि जळगावात ९३ टक्के पाऊस पडेल. पश्चिम महाराष्ट्रात, कोल्हापूर परिसरात ९५ टक्के, कराड, पाडेगाव, सोलापूर आणि राहुरी परिसरात ९३ टक्के आणि पुणे परिसरात ९४ टक्के पावसाचा अंदाज डॉ. साबळे यांनी व्यक्त केला आहे.