पिंपरी: दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी घरासमोर थांबलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूने वार करून तिचा खून केल्याची घटना वाल्हेकरवाडी येथे घडली. आर्थिक कारणावरून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

उदयभान बन्सी यादव (वय ४२, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिषेक रणविजय यादव (वय २१, रा. उत्तर प्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. मुलीच्या मामाने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी ही आई व भावासोबत राहत होती.

रविवारी रात्री आठच्या सुमारास मुलगी घराबाहेर थांबली होती. या वेळी दुचाकीवर आलेल्या उदयभान व अभिषेक यांनी तिच्यावर चाकूने वार केले. गळा, पाठ आणि हातावर वार केल्याने मुलगी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. मुलीला सुरुवातीला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच ती मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही आरोपींना अटक केली. आर्थिक कारणावरून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.‘खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. आरोपींकडे सखोल चौकशी केल्यानंतर खुनामागील कारणाचा उलगडा होईल,’ असे सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी सांगितले.