पुणे : मार्केट यार्ड भागातील डाॅ. आंबेडकरनगर परिसरात कोयता गँगने दहशत माजविली. अल्पवयीन मुलांनी कोयते उगारुन दुचाकी आणि हातगाड्यांची तोडफोड केली.

शिवाजीनगर भागातील कोयता गँगवर कारवाई करा ! भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

याबाबत इस्माईल अयाज शेख (वय ३२, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डाॅ. आंबेडकरनगरमधील सहा ते सात अल्पवयीन मुले रात्री गल्ली क्रमांक १६ परिसरात कोयते आणि तलवारी घेऊन शिरले. टोळक्याने कोयते उगारुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दुकाने बंद करण्यास सांगितले. परिसरात दहशत माजवून टोळक्याने सात दुचाकी आणि हातगाड्यांची तोडफोड केली. दहशत माजवून अल्पवयीन मुले पसार झाली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

तरुण असे का वागतात? पुण्यात कोयता गॅंगच्या कहराच्या पार्श्वभूमीवर मानसोपचारतज्ज्ञांनी दिली ‘ही’ माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील वेगवेगळ्या भागात गेल्या महिनाभरापासून कोयते उगारुन दहशत माजविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. कोयता गँगमध्ये अल्पवयीन मुले असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.