मागील महिन्याभरापासून छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की, स्वराज्य रक्षक यावरून सध्या वाद सुरू आहे. त्याबाबत स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार संभाजी राजे यांना विचारले असता ते म्हणाले की, “आता आपण त्याच्यापलीकडे जाण्याची गरज आहे. या काही जुन्या पदव्या नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूळ उपाध्या वेगळ्या आहेत.”

१०० ते २०० वर्षांत आमच्यासारख्या लोकांकडून दिलेल्या उपाध्या आहेत. तर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर आणि धर्मवीर असल्याचे आजवर मी केलेल्या ऐतिहासिक भाषणात सांगितले आहे. त्यावेळी कोणाला लक्षात आले नाही. पण आता धर्मवीर शब्दावरून वेगवेगळे राजकीय पक्ष राजकारण करत आहेत, अशी भूमिका संभाजी राजे यांनी मांडली.

हेही वाचा – मोठी बातमी! एमपीएससीची २०२३ मधील मेगा भरती, ८ हजार १६९ पदांसाठी प्रक्रिया राबवली जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल मुंबईत आले होते. आपल्या राज्याला काय मिळाले, असे वाटते. या प्रश्नावर संभाजी राजे म्हणाले की, “मी काल रायगडावर होतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले याबद्दल मला माहिती नाही. मी किल्ल्यावर असल्याने मला दुसर काही सुचत नव्हते. रायगड किल्ल्याचे संवर्धन कसे करता येईल. मी त्यामध्ये मग्न होतो.”

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाबाबत राज्य आणि केंद्र सरकारकडून कोणतीही भूमिका मांडताना दिसत नाही. त्यावर संभाजी राजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या जलपूजन कार्यक्रमास गेलो होतो. पण आता त्यावर कोणीही बोलण्यास तयार नाही. तसेच आता राज्य सरकारने त्यांच्या हातात ज्या काही गोष्टी आहेत किमान त्या तरी त्यांनी करण्याची गरज आहे. ती म्हणजे गड किल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. ज्या प्रकारे रायगड किल्ल्याचे संवर्धन सुरू आहे, त्या धर्तीवर किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – मोठी बातमी! एमपीएससीची २०२३ मधील मेगा भरती, ८ हजार १६९ पदांसाठी प्रक्रिया राबवली जाणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संभाजीराजे पुढे म्हणाले की, “आपल्या राज्यात समुद्राच्या किनाऱ्यावर सर्वाधिक किल्ले आहेत. त्याबाबतचा प्लान माझ्याकडे आहे. त्यावर मी बोलून थकलो असून त्याची कोणीही दखल घेत नाही. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेमध्ये आला आहात ना, तर राज्यातील गड किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे,” अशी मागणी संभाजी राजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली.