पुण्यातील मनसेचे नेते संजय मोरे पुन्हा एकदा नाराज असल्याचे म्हटलले जात आहे. पुण्यात आयोजित केलेल्या मनसेच्या एका कार्यक्रमात बोलू न दिल्यामुळे ते नाराज असल्याचे म्हटले जात आहे. या नाराजीवर बोलताना मला या कार्यक्रमात बोलू द्यायला हवे होते, अशी प्रतिक्रियादेकील मोरे यांनी दिली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. यापूर्वीही त्यांच्या नाराजीमुळे पुणे मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.

हेही वाचा >> सुषमा अंधारे यांचे मोठे विधान! शिंदे गटात अनेकजण नाराज असल्याचे म्हणत थेट नेत्यांची घेतली नावे, म्हणाल्या “लवकरच…”

मनसे नेते वसंत मोरे यांना पुणे शहरातील मनसेच्या कार्यक्रमाला बोलावण्यात आले होते. मात्र त्यांना भाषणच करू देण्यात आले नाही. त्यामुळे मोरे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या चर्चेमुळे मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटतट आणि वाद विसरून एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाण्याची सूचना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा न पटल्याने वसंत मोरे नाराज होते. तेव्हापासून शहर मनसे पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यातील विसंवाद सातत्याने पुढे आला आहे. स्थानिक पदाधिकारी डावलत असल्याचा आरोप मोरे यांनी केला होता. राज ठाकरे पक्ष कार्यालयात येतील तेव्हाच कार्यालयात जाईन, अशी भूमिका मोरे यांनी जाहीर केली होती. त्यात या नव्या वादाची भर पडली आहे.

“मी नाराज नाही. माझे कार्कर्ते नाराज आहेत. पुणे शहरात मनसेच्या शाखा अध्यक्षांचा मेळावा झाला. या मेळाव्यात कोअर कमिटीचे सदस्य होते. या मेळाव्यादरम्यान मंचावर असल्यामुळे मला बोलू द्यायला हवं होतं, अशी भावना माझ्या कार्यकर्त्यांची आहे. मला त्या मंचावर बोलण्याची संधी मिळाली नाही. तात्या आम्ही तुम्हाला ऐकायला आलो होतो, तुम्ही भाषण का केले नाही असे मला माझे कार्यकर्ते विचार होते. भाषण करणाऱ्यांच्या यादीमध्ये माझे नावच नव्हते. त्यामुळे मी कसे बोलणार. तेथील नेत्यांनी मला बोलू द्यायला हवे होते. माझ्यासह अनेक नेते होते. त्यांनादेखील बोलू द्यायला हवं होतं,” अशी प्रतिकिया वसंत मोरे यांनी दिली आहे.

हेही वाचा >> “…अन् त्या बदलाची प्रेरणा असेल शिवछत्रपतींचं एक धोरणी वाक्य!”, राज ठाकरेंच्या सभेआधी मनसेकडून टीझर रिलीज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुंबई, औरंगाबाद तसेच अन्य महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेकडून पक्षबांधणी केली जात आहे. यासाठी खुद्द राज ठाकरे मैदानात उतरले असून ते मनसेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. आज (२७ नोव्हेंबर) मनसेच्या मुंबई गटाध्यक्षांचा मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यात राज ठाकरे मनसेच्या गटाध्यक्ष तसे अन्य कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी राज ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.