लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याच्या सुचना पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातही मनसेचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.
      
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी बारामती लोकसभा मतदारसंघातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बारामतीत पार पडली. या बैठकीला मनसेचे नेते दिलीप धोत्रे, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटसकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष पोपट सुर्यवंशी, संतोष दासवडकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी वाचा- पुणे : आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी; सॅलिसबरी पार्कात छापा

बारामती लोकसभा मतदारसंघातील मनसे कार्यकर्ते जोमाने काम करुन सुनेत्रा पवार यांच्या विजयात वाटेकरी ठरतील अशी ग्वाही मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. मनसे नेते राज ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबाशी माझा व्यक्तिगत स्नेह राहिला आहे. त्यातही शर्मिला ठाकरे या माझ्या खास मैत्रिण आहेत असे सुनेत्रा पवार यांनी आवर्जून सांगितलं. माझ्या या निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या मनसैनिकांची जाणीव ठेवून त्यांच्या हाकेला नेहमीच प्रतिसाद असेल असेही सुनेत्रा पवार यांनी या वेळी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बाबत कांदळवन विभाग अधिकारी सुधीर मांजरेकर यांनी सांगितले कि सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणी चौकशीही केली जाईल