कात्रज भागात दहशत माजविणारा गुंड चंद्रशेखर ठोंबरे आणि साथीदारांच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.या प्रकरणी चंद्रशेखर उर्फ शेखर विठोबा ठोंबरे (वय २४, रा. कदम चाळ, संतोषनगर, कात्रज), अझरुद्दीन उर्फ अझहर दिलावर शेख (वय २२, रा. समर्थ निवास, संतोषनगर, कात्रज), जादेब मेहबूब मुल्ला (वय २७, रा. संतोषनगर, कात्रज), इशान निसार शेख (वय २०, रा. अंजनीनगर, कात्रज), तौफिक लाला शेख (वय २९, रा. मांगडेवाडी, कात्रज) यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. ठोंबरे आणि साथीदारांनी कात्रज भागात दहशत माजविली होती.

हेही वाचा >>> पुणे : न बरसलेल्या पावसाचीही मिरवणूक लांबण्यास ‘साथ’; अंदाजानुसार पाऊस कोसळलाच नाही

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
two accused arrested in Salman Khan house firing case (1)
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअर
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न

त्यांच्या विरोधात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. कारवाईनंतर त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती. त्यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त सागर पाटील यांच्याकडे सादर केला होता. सहायक आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्फत पोलीस आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावास नुकतीच मंजुरी देण्यात आली. गेल्या नऊ महिन्यात पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहरातील ३० गुंड टोळ्यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. दीड वर्षात शहरातील ९३ टोळ्यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.