scorecardresearch

दिव्यांगाच्या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

दिव्यांग नागरिकांना लवकरात लवकर साहित्य उपलब्ध करून द्यावे. अन्यथा साहित्य उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी आम्ही न्यायालयात जाऊ – खासदार सुप्रिया सुळे

MP Supriya Sule, agitation, NCP, Pune District Collector office, Divyang issues
दिव्यांगाच्या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

केंद्र सरकारने ADIP आणि वयोश्री योजने अंतर्गत दिव्यांगांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

“दिव्यांग नागरिकांसाठी काही महिन्यापासून केंद्र सरकार कोणत्याही प्रकारचे निर्णय करीत नाही. त्यातील मुख्य म्हणजे त्यांना लागणार साहित्य उपलब्ध केले जात नाही. त्यामुळे त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे” अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

हेही वाचा… पुणे : चित्रा वाघ यांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानावर सुप्रिया सुळेंचे मौन

हेही वाचा… पुणे: येरवड्यात कोयता गॅंगची दहशत, तरुणावर वार; चार अल्पवयीन मुले ताब्यात

केंद्रातील मंत्र्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही कोणाचेही फोटो लावा पण दिव्यांग नागरिकांना लवकरात लवकर साहित्य उपलब्ध करून द्यावे.अन्यथा साहित्य उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी आम्ही न्यायालयात धाव घेऊ अशी प्रतिक्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 12:31 IST