scorecardresearch

पुणे : चित्रा वाघ यांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानावर सुप्रिया सुळेंचे मौन

चित्रा वाघ यांनी काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमात भाजपाचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा जोतिबा फुले यांच्याशी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

Supriya Sule on Chitra Wagh
चित्रा वाघ यांच्या 'त्या' वादग्रस्त विधानावर सुप्रिया सुळेंचे मौन (image – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमात भाजपाचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा जोतिबा फुले यांच्याशी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या विधानाबाबत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी मौन बाळगणे पसंत केले.

हेही वाचा – “चंद्रकांत पाटलांसारख्या जोतिबांचा शोध सुरु”, चित्रा वाघ यांच्या विधानावरून मिटकरींचा खोचक सवाल; म्हणाले, “हेच विधान जर…”

हेही वाचा – पुणे: येरवड्यात कोयता गॅंगची दहशत, तरुणावर वार; चार अल्पवयीन मुले ताब्यात

‘घराघरात सावित्री झाल्या आहेत. आम्हाला आता चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या जोतिबांचा शोध आहे,’ असे विधान चित्रा वाघ यांनी केले आहे. त्या विधानावर राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी आणि संभाजी ब्रिगेडकडून टीका करण्यात येत आहे. चित्रा वाघ यांच्या या विधानामुळे नाव्या वादाला सुरुवात झाली आहे. त्याच दरम्यान आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या दिव्यांग नागरिकांच्या प्रश्नावर आंदोलनासाठी आल्या होत्या. त्यावेळी चित्रा वाघ यांच्या विधानाबाबत प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांनी त्यावर मौन बाळगणे पसंत केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 11:49 IST