पुणे : पुणे शहरातील मॉडेल कॉलनीमधील जैन समाजाच्या जमीन व्यवहार प्रकरणावरून भाजपचे नेते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार रविंद्र धंगेकर हे दररोज नवनवीन माहिती समोर आणून मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका करीत आहे.त्या प्रश्नावर मुरलीधर मोहोळ म्हणाले,मी त्या दिवशीच माझ स्पष्टीकरण दिल आहे.लोकसभा, विधानसभा निवडणुक झाली आहे.त्यानंतर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली जात आहे.हे लक्षात घेता,राजकीय नैराश्यामधून टीका केली जात आहे.त्यामुळे वैफल्यग्रस्त माणसाकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार,अशा शब्दात रविंद्र धंगेकर यांना टोला लगावला.
गोखले बांधकाम व्यावसायिक बाबतचा तुमचा व्हिडीओ सोशल मीडियावर झाला.त्या प्रश्नावर मुरलीधर मोहोळ म्हणाले,त्या व्हिडिओबाबत यापुर्वी देखील भूमिका मांडली आहे.विशाल गोखले हा माझा मित्र होता,आहे आणि राहणार आहे.यामध्ये कोणताही बदल नाही.पाच वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ काढला आणि मी जाहिरात करीत असल्याचे दाखविण्यात आले.तो व्हिडिओ कालचा किंवा परवाचा नाही.तसेच काल एक जण (रविंद्र धंगेकर यांचा व्हिडीओ) कोणाची तरी जाहिरात करीत असल्याच दिसल,मग ते लगेच पार्टनर झाले का असा सवाल उपस्थित करित मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले,त्यामध्ये आपण जाऊ नये, पण या पुणे शहराची एक राजकीय संस्कृती असून कुठे तरी एक माणुस त्याची वाट लावत आहे.त्यामुळे सर्वांनी सावध राहण्याचा सल्ला देत रविंद्र धंगेकर यांना टोला लगावला.
काही दिवसापूर्वी चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील रविंद्र धगेकर हे टीका करीत होते.त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिली होती.त्यानंतर तुमच्यावर टीका करण्यास सुरवात झाली आहे.शिवसेना महायुती मध्ये असून देखील एकनाथ शिंदे हे रविंद्र धगेकर यांच्यावर कारवाई का करित नाही.त्या प्रश्नावर मुरलीधर मोहोळ म्हणाले,हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न असून मी त्यावर बोलणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे महापालिका त्या प्रश्नावर उत्तर देईल : मुरलीधर मोहोळ
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे पुणे महापालिकेमध्ये महापौर असताना माझे बालेवाडी येथील काम थांबवले असून त्यामध्ये माझे आर्थिक नुकसान मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.त्याबाबत चा व्हिडिओ एका बांधकाम व्यावसायिकांने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्या आरोपांबाबत मुरलीधर मोहोळ यांना विचारले असता म्हणाले,मी पुणे शहराचा महापौर असताना, माझ्याकडे शहरातील अनेक भागातील नागरिक तक्रार घेऊन येत होते.त्यावेळी बाणेर बालेवाडी भागातील बालवडकर नावाचे शेतकरी माझ्याकडे आले होते.
संबधित बिल्डरने खोटी मोजणी करून प्लॅन मंजूर केला आहे.त्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत. या बाबी मला दाखवून दिली.त्यावेळी मी प्रशासनाकडून माहिती घेतली होती.त्यापूर्वीच प्रशासनाकडून काम थांबविण्याचे आदेश दिले होते.तसेच महापौरपदाचा कालावधी पूर्ण होऊन जवळपास पाच वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे.मी आता पुणे महापालिका प्रशासनामध्ये नाही आणि हे प्रकरण पाच वर्षा पूर्वीचे आहे.त्यामुळे आता त्यावर महापालिका प्रश्न उत्तर देईल,तसेच कोणीही उठायच आणि काही आरोप करायचे,त्यामुळे यामागे चावी देणारा कोणी तरी वेगळा असेल,त्याकडे मी काही लक्ष देत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
