NCP protest against corruption in water supply department in Pimpri-Chinchwad Municipal Corporation | Loksatta

X

पाणीपुरवठा विभागातील भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत आंदोलन

भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या जॅकवेलच्या कामाची मूळ निविदा १२१ कोटी रुपयांची असताना, १५१ कोटी रुपयांची निविदा सादर करणाऱ्या ठेकेदाराला हे काम देण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे

पाणीपुरवठा विभागातील भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत आंदोलन
पाणीपुरवठा विभागातील भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत आंदोलन

भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधण्यात येणार्या जॅकवेलच्या कामात तब्बल ३० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पिंपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच, पाणीपुरवठा विभागप्रमुखांना घेराव घालण्यात आला.

हेही वाचा- तांत्रिक बिघाडामुळे वायुदलाचे हेलिकॉप्टर बारामतीच्या शेतात; आपत्कालीन स्थितीत उतरविले, कोणालाही इजा नाही

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे, राहुल भोसले, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, प्रशांत शितोळे, श्याम लांडे, विनोद नढे, सतीश दरेकर, विनायक रणसुभे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. ‘प्रशासकीय राजवट हटवा, पिंपरी-चिंचवड वाचवा’ अशा विविध घोषणांनी पालिका भवन दणाणून सोडले होते.

हेही वाचा- पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर ‘रस्ता सुरक्षा अभियान’; महामार्गावर आरटीओ, पोलीस असणार २४ तास ऑन ड्युटी

यासंदर्भात अजित गव्हाणे म्हणाले, भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या जॅकवेलच्या कामाची मूळ निविदा १२१ कोटी रुपयांची असताना, १५१ कोटी रुपयांची निविदा सादर करणाऱ्या ठेकेदाराला हे काम देण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे. राज्यातील सत्तेच्या जोरावर भाजप नेत्यांनी पालिका प्रशासनाशी संगनमत केले असून पालिकेची आर्थिक लूट सुरू आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी ही निविदा त्वरीत रद्द करावी, अशी मागणी केल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 18:02 IST
Next Story
तांत्रिक बिघाडामुळे वायुदलाचे हेलिकॉप्टर बारामतीच्या शेतात; आपत्कालीन स्थितीत उतरविले, कोणालाही इजा नाही