RTO Highway Police will be on duty 24 hours to prevent accidents on Pune-Mumbai Expressway | Loksatta

X

पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर ‘रस्ता सुरक्षा अभियान’; महामार्गावर आरटीओ, पोलीस असणार २४ तास ऑन ड्युटी

आरटीओ आणि महामार्गचे एकूण ३० अधिकारी जुना महामार्ग आणि पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर कार्यरत राहणार आहेत.

पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर ‘रस्ता सुरक्षा अभियान’; महामार्गावर आरटीओ, पोलीस असणार २४ तास ऑन ड्युटी
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर आरटीओ, महामार्ग पोलीस असणार ऑन ड्युटी २४ तास

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर आजपासून रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जात आहे. आरटीओ अधिकारी, कर्मचारी आणि महामार्ग पोलिसांची १२ पथकं जुना आणि यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर कार्यरत असणार आहेत. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी आणि वाहनचालकांना शिस्त लागावी म्हणून हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती उप परिवहन आयुक्त (रस्ता सुरक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई चे भरत कळसकर ह्यांनी दिली आहे. ते मावळमध्ये प्रसारमध्यमांशी बोलत होते. हा उपक्रम पुढील सहा महिने सुरू राहणार असून यातून अनेक चालक सुधारतील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. 

हेही वाचा- पुणे: पाणीटंचाईची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल; स्थानिक स्वराज्य संस्थांना १३ डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश

भरत कळसकर म्हणाले की, आजपासून मोटार वाहन विभाग आणि महामार्ग पोलिस यांच्याकडून रस्ता सुरक्षा उपक्रम राबवला जात आहे. आरटीओ आणि महामार्गचे एकूण ३० अधिकारी जुना महामार्ग आणि पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर कार्यरत राहणार आहेत. दोन्ही रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. ८० टक्के वाहनचालक नियम पाळत नसल्याने अपघातात होतात. २०२१ मध्ये २०० अपघात झाले असून ८८ जणांना जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. पुढे ते म्हणाले की, पहिले सात दिवस जनजागृती करणार आहोत. मग पुढे कारवाई केली जाणार आहे. लेन कटिंग, ओव्हर स्पीड, सीट बेल्ट यासह इतर नियम न पाळणाऱ्या वाहनचलकांवर १२ पथक २४ तास करडी नजर ठेवून असणार आहेत अस देखील त्यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा- पुणे: काँग्रेसचा उद्यापासून सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताह

हे नियम तोडल्यास होणार कडक कारवाई

  • पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर अवैधरित्या पार्किंग केल्यास कारवाई होणार,
  • वाहतूक अडथळा झाल्यास देखील कारवाई होणार,
  • ओव्हर स्पीड असलेल्या वाहनांवर कारवाई केली जाणार,
  • उजव्या मार्गिकेतून ट्रक, बस कंटेनर आदी कमी वेगात चालणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाणार
  • विना सीटबेल्ट प्रवास करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 16:56 IST
Next Story
पुणे: पाणीटंचाईची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल; स्थानिक स्वराज्य संस्थांना १३ डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश