पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसची आम्हाला गरज नाही. हा पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच राष्ट्रवादीचे धोरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत कोणी टिकत नाही. आगामी काळात राष्ट्रवादीकडे उमेदवारही राहणार नाहीत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केली.

पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्युट येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, की बारामतीत दहशतीचे वातावरण आहे. गेल्या ४० वर्षांसापासून एकाच घरात सत्ता आहे. त्यामुळे तेथील लोक बाहेर बैठकीत येण्यासही घाबरतात. राष्ट्रवादी नेत्यांकडे नैतिकता असेल, तर जितेंद्र आव्हाड यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे. तसेच आव्हाड यांना निलंबित केले पाहिजे. ज्या कारणासाठी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्याच्या कृतीचे समर्थन करून बोलणाऱ्यांचे नाव गुन्ह्यात सहभागी करण्याची मागणी आहे. राज्य सरकारने संवेदनशील मार्गाने गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :“…याला महाराष्ट्रात विनयभंग म्हणतात का?” आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सुप्रिया सुळेंचा संताप

दरम्यान, ‘फ्रेंड्स ऑफ भाजपा’ असे अभियान सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, विकास, नागरिकांच्या पक्षाच्या बाबतीत, सूचना जाणून पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यात येतील. सन २०२४ पर्यंत केंद्र आणि राज्य सरकारकडून पुण्याच्या विकासासाठी प्रयत्न करू. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमची तयारी सुरू असून महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस आणि इतर मित्र पक्ष ४५ लोकसभा आणि २०० विधानसभा जागा जिंकण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी संघटनात्मक बांधणी सुरू आहे. ७०३०७७६१६१ या क्रमांकावर मिसकॉल केला, तरी सभासद नोंदणी होणार आहे.

हेही वाचा: ‘वडील कर्ज फेडणार आहेत त्यांना खुश कर’; सासऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला पतीकडून मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बावनकुळे काय म्हणाले ?

  • महविकास आघाडी सरकारने केंद्राच्या योजना लाभार्थ्यांपर्यत पोहचू दिल्या नाहीत
  • राष्ट्रीय स्तरावर गॅस, पेट्रोल-डिझेलच्या किंमती ठरतात, त्यामुळे यांच्या दरवाढीबाबत बोलू शकत नाही
  • गजानन कीर्तीकर यांच्या सारखा नेता निघून जाणे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पतन होत असल्याचे द्योतक आहे. २०२४ मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत केवळ चार माणसे राहतील.