पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना आता नवीन ४६ मोटारी मिळाल्या आहेत. सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते मंगळवारी या मोटारींचे हस्तांतरण करण्यात आले.

जनतेला आरोग्य सुविधा तातडीने पुरविता याव्यात यासाठी या मोटारी खरेदी करण्यात आल्या आहेत. विधानभवनात झालेल्या कार्यक्रमात मंत्री सावंत यांच्या हस्ते या मोटारींचे हस्तांतरण करण्यात आले. या वेळी विभागीय उपायुक्त वर्षा ऊंटवाल-लड्डा, रामचंद्र शिंदे, सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर, उपसंचालक कैलास कराळे, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आणखी वाचा-आयसिस आणि अलसुफाच्या ‘या’ दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ‘एनआयए’कडून बक्षीस जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोग्य आयुक्त, आरोग्य सेवा अंतर्गत राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे काम सुरळीत पार पाडावे, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. या वाहन खरेदीसाठी ३ कोटी ६८ लाख रुपयांच्या खर्चास सरकारने मंजुरी दिली होती. राज्यातील ५ उपसंचालक, ११ सहायक संचालक, १४ जिल्हा आरोग्य अधिकारी व १६ जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयाला ही वाहने हस्तांतरीत करण्यात आली आहेत.