पुणे : महर्षीनगर भागातून मध्यरात्री नऊ वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तरुणास ताब्यात घेतले आहे. ईश्वर सावणे (वय २०, रा. इंदिरानगर, गुलटेकडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. सावणे मध्यरात्री महर्षीनगर भागातून निघाला होता. त्याला एकाने हटकले. त्यानंतर सावणे पुन्हा महर्षीनगर भागात आला. त्याने परिसरातील नऊ वाहनांची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपास सुरु केला. सावणेला पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.