scorecardresearch

पुणे : एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, दुरुस्ती नोंदवण्यासाठी २२ ऑगस्टची मुदत

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजना परीक्षेचा (एनएमएमएस) निकाल करण्यात आला आहे.

पुणे : एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, दुरुस्ती नोंदवण्यासाठी २२ ऑगस्टची मुदत
(संग्रहीत छायाचित्र)

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजना परीक्षेचा (एनएमएमएस) निकाल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली असून, गुणवत्ता यादीतील नाव, जन्मतारीख, प्रवर्ग या संदर्भातील दुरुस्ती २२ ऑगस्टपर्यंत नोंदवता येईल.

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेउन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना; तसेच त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे, हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. त्यानुसार जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील नाव, जन्मतारीख, प्रवर्गाबाबत काही दुरुस्ती असल्यास शाळांना nmms.msce@gmail.com या ईमेलवर माहिती पाठवता येईल.

आलेल्या सर्व दुरुस्त्या विचारात घेऊन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्याची अंतिम निवडयादी परिषदेच्या http://www.mscepune.in आणि https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आल्याने गुणपडताळणी केली जाणार नसल्याचे परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nmms scholarship exam result declared pune print news amy