पुणे : विक्री न झालेल्या घरांच्या संख्येवरून गृहनिर्माण क्षेत्राच्या स्थितीचे मूल्यमापन केले जाते. देशातील विक्री न झालेल्या घरांची संख्या गेल्या ६ वर्षांत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. दिल्लीत सर्वाधिक ५६ टक्क्यांनी ही संख्या कमी झाली असून, मुंबई आणि पुण्यात ८ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे गृहनिर्माण क्षेत्रातील वाढती मागणी समोर आली आहे.

अनारॉक ग्रुपने देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार, दिल्लीत विक्री न झालेल्या घरांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. गेल्या ६ वर्षांत दिल्लीतील विक्री न झालेल्या घरांची संख्या ५७ टक्क्यांनी घटली आहे. याचवेळी बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईत ही संख्या ११ टक्क्यांनी कमी झाली असून, कोलकात्यात ४१ टक्क्यांनी कमी झाली आहे. मुंबई आणि पुण्यात ही संख्या ८ टक्क्यांनी घटली आहे.

आणखी वाचा-पुण्यातील डॉक्टरांनी अधिवृक्क ग्रंथीतून काढली २३ सेंटिमीटरची गाठ! लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

दिल्लीत २०१८ मधील पहिल्या तिमाहीत विक्री न झालेल्या घरांची संख्या २ लाख होती. यंदा पहिल्या तिमाहीअखेर ही संख्या ८६ हजार ४२० वर आली आहे. याचवेळी दक्षिणेकडील बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईत या शहरांत मिळून ही संख्या १ लाख ९६ हजारांवरून १ लाख ७६ हजारांवर आली आहे. हैदराबादमध्ये नवीन घरांच्या पुरवठ्यात गेल्या ६ वर्षांत चौपट वाढ झाली आहे. त्यामुळे विक्री न झालेल्या घरांची संख्या अधिक दिसत आहे. केवळ बंगळुरूचा विचार करता ६ वर्षांत विक्री न झालेल्या घरांची संख्या ५० टक्क्यांनी घटली आहे. मुंबई आणि पुण्याचा विचार करता विक्री न झालेल्या घरांची संख्या ६ वर्षांत ३ लाख १३ हजारांवरून २ लाख ९० हजारांवर आली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आणखी वाचा-थरार! मनोरुग्ण पुणे रेल्वे स्थानकाच्या छतावर चढतो तेव्हा…

विक्री न झालेल्या घरांची संख्या

विभाग जानेवारी ते मार्च २०१८जानेवारी ते मार्च २०२४
उत्तर (दिल्ली) २,००,४७६८६,४२०
दक्षिण (बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई)१,९६,४०६१,७५,५२०
पश्चिम (मुंबई, पुणे) ३,१३,४८५२,८९,६७७
पूर्व कोलकता४९,५६०२९,२७८

दिल्लीत नवीन घरांचा पुरवठा विकासकांनी नियंत्रणात ठेवल्याने विक्री न झालेल्या घरांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत झाली. देशभरात नवीन घरांचा पुरवठा वाढत असताना विक्री न झालेल्या घरांचे प्रमाण कमी होत असून, गृहनिर्माण क्षेत्राची आगेकूच त्यातून दिसून येत आहे. -संतोष कुमार, उपाध्यक्ष, अनारॉक ग्रुप