लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : घटनास्थळ पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल हरिदास आव्हाड (वय ४३, रा. गौतमनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विठ्ठल हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जिजामाता रूग्णालयात आरोग्य विभागात कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासन निर्णयान्वये एखाद्या गंभीर गुन्ह्यात घटनास्थळ पंचनाम्यासाठी सरकारी कर्मचार्‍याला साक्षीदार म्हणून घेण्यात येते. त्यानुसार पोलिसांनी विठ्ठल यांना एका गुन्ह्यात घटनास्थळ पंचनाम्यासाठी घेतले. मात्र, कागदपत्रे तयार झाल्यानंतर ऐनवेळी विठ्ठल यांनी पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला.

आणखी वाचा-पुणे : मोबाइलमधील हॉटस्पॉट यंत्रणेचा वापर करण्यास नकार दिल्याने तरुणाचा खून, हडपसर भागातील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारी कामात मदत करणे बंधनकारक असल्याचे त्यांना समजून सांगण्यात आले. त्यांच्या कार्यालयाकडूनही घटनास्थळ पंचनामा करण्यासाठी लेखी आदेश होते. असे असताना देखील विठ्ठल यांनी घटनास्थळ पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार सोनमाळी तपास करीत आहेत.