पुण्यात मतिमंद तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. एका ६५ वर्षांच्या नराधमाने २३ वर्षीय गतिमंद तरुणीवर बलात्कार केला. संबधित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. बंडगार्डन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताडीवाला रोडवरील दुष्काळ झोपडीपट्टी येथे पीडित २३ वर्षीय गतिमंद तरुणी राहत आहे. तिच्या घराच्या शेजारी राहणारा अशोक गंगाराम शेलार (वय ६५) याने काल (दि. १९) दुपारी २ नंतर पीडित मुलीला घरात बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती तिने तिच्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेमुळे त्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.