पुणे : भाजपाच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंकजा मुंडे या पुणे दौर्‍यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांना जालना येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी नागरिक आठ दिवसांपासून बसून आहेत, पण अद्यापपर्यत राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत, असे विचारण्यात आले. त्यावर, घटना अत्यंत दुर्दैवी असून तिची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी पंकजा यांनी केली.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, जालन्यातील घटनेची सखोल आणि निःपक्षपाती चौकशी झाली पाहिजे. आता नुसती आश्वासने नकोत, तर पोटातून भावना करून एखाद्याने नेतृत्त्व स्वीकारले पाहिजे. तसेच मराठा समाजाला आरक्षण कसे आणि किती मिळणार हे ठोक ताळे सांगणारा आश्वासित असा चेहरा समोर आला पाहिजे, अशी भूमिका मांडत पंकजा मुंडे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे.

हेही वाचा – पिंपरीतील बीआरटी मार्गातून वाहन चालविल्यास ५०० रुपये दंड…पुन्हा चूक केल्यास भरा १५०० रुपये

हेही वाचा – देहूरोडमध्ये श्वानांचा छळ; दोघांविरोधात गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशातील विरोधकांच्या इंडिया आघाडीमुळे सत्ताधारी केंद्र सरकारकडून सर्व ठिकाणी भारत करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यावरून अनेक आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. त्या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, तुम्ही इंडियात राहता की भारतात? आपलं नाव भारत आहे आणि इंडिया हे झाले आहे. बॉम्बेच मुंबई होऊ शकते, तर इंडिया भारत ही एक चर्चा असून त्यावर काही तरी निर्णय होईल. तसेच आपण दोन्हीमध्ये राहत नसून त्या काळात कॉलनियन लोकांनी दिलेल नाव आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.