कार्तिकी यात्रेनिमित्त खालापूर येथून आळंदीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप शिरल्याने पुण्यात मोठा अपघात झाला. यात ४ वारकऱ्यांचा मृत्यू झालाय, तर जवळपास ३० वारकरी जखमी झालेत. ही घटना आज (२७ नोव्हेंबर) सकाळी ७ च्या सुमारास कान्हेफाटा येथे घडली. यानंतर पिकअप चालकाला वडगाव मावळ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खालापूर उंबरी गाव येथून सुमारे दीडशे वारकरी हे आळंदीच्या दिशेने कार्तिकी यात्रेनिमित्त निघाले होते. हरिनामाचा गजर करत वारकरी रस्त्याच्याकडेने पायी जात होते. तेव्हा, जवळवून जाणाऱ्या पिकअप चालकाचा वाहनांवरील नियंत्रण सुटले आणि वारकऱ्यांच्या रांगेच्या मधोमध जाऊन काही जणांना धडक दिली. यात, ३० वारकरी जखमी झाल्याची माहिती तपास अधिकारी वडगाव मावळचे पोलीस उपनिरीक्षक चामे यांनी दिली आहे.

हेही वाचा : पोलीस चौकीत जाण्यापासून तक्रारीची प्रत मिळेपर्यंत FIR कशी होते? पुणे पोलिसांनी सांगितल्या ‘या’ ८ पायऱ्या

अद्याप गंभीर किती आहेत हे समजू शकेल नाही. जखमींना जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी पिकअप चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pick up vehicle hit alandi dindi warkari in pune some dead many injured pbs
First published on: 27-11-2021 at 09:50 IST