पिंपरी : तीनवेळा तलाक बोलून घटस्फोट देत दुसरे लग्न करणा-याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पिंपरीतील मासुळकर कॉलनी येथे घडला. याप्रकरणी पती अकीब आसिफ खान (वय ३१), सासरे आसिफ अब्दुल्ला खान (वय ६२, दोघे रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांच्यासह तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी नणदेच्या लग्नासाठी फिर्यादीकडे माहेराहून पाच लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला. मानसिक व शारीरिक त्रास दिला. पती अकीब याने तीनवेळा तलाक बोलून फिर्यादीला माहेरी हाकलून दिले. फिर्यादीच्या संमतीशिवाय दुसरे लग्न केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 29th May 2023 रोजी प्रकाशित
पिंपरी : तोंडी तलाक देऊन दुसरे लग्न करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
तीनवेळा तलाक बोलून घटस्फोट देत दुसरे लग्न करणा-याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 29-05-2023 at 13:22 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri crime against remarriage divorce pune print news ggy 03 ysh