पिंपरी – चिंचवड : घुसखोरी करून पिंपरी- चिंचवडमध्ये राहणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना अटक करून त्यांना बांगलादेशात परत पाठवले आहे. ही कारवाई पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट चार ने केली आहे. मोहम्मद उस्मान शिराजून अली शेख, मोबिन हारून शेख, अब्दुल्ला शागर मुल्ला, जहांगीर बिलाल मुल्ला, मोहम्मद इलाहीन इलियास बिश्वास आणि तोहीद मुस्लेम हसन शेख यांना अटक करून त्यांच्या देशात पाठवण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी- चिंचवड शहरात घुसखोर बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू आहे. ओळख लपवून अनेक जण राहत असल्याचं वारंवार समोर आलेलं आहे. पंधरा दिवसांपूर्वी भुजबळ चौकातून मुंबईला ५- ६ बांगलादेशी नागरिक जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या टीम ला मिळाली होती.
सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पवार यांच्या टीमने तिथं सापळा रचला आणि सहा जणांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी करण्यात आली. ते भारतीय असल्याचा पुरावा कुठलीही कागदपत्रे मिळाली नाहीत. ते बांगलादेशी घुसखोर नागरिक असल्याचं शेवटी निष्पन्न झाल. त्यांना अटक करण्यात आली. परंतु, भारत सरकारच्या नवीन नियमानुसार या सहा जणांची माहिती केंद्र सरकार ला देण्यात आली. तिथून भारतीय दूतावास यांनी बांगलादेशी दुतावासाशी संपर्क साधून ते राहत असलेल्या ठिकाणी खात्री करून मग त्यांना विमानाने गुवाहाटी आणि तिथून बांगलादेशी विमाने मायदेशी घेऊन जाण्यात आलं. या सर्व कारवाई ला एकूण पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागला. यात सहा बांगलादेशी नागरिकांना पकडून त्यांना त्यांच्या देशात पाठवण्यात आल आहे. ही सर्व कारवाई पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.