पुणे : आंतराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध लिव्हाइस कंपनीच्या नावाने बनावट कपड्यांची विक्री करणाऱ्या वस्त्रदालनात पोलिसांनी छापा टाकला. एरंडवणे भागात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ११८ जीन, शर्ट, टीशर्ट असा चार लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी स्वामित्त्व हक्क कायद्यान्वये (काॅपीराइट ॲक्ट) अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एरंडवणे भागातील गुळवणी महाराज रस्त्यावरील ब्रॅँड काईड क्लोदिंग या वस्त्रादालनात लिव्हाइस कंपनीच्या बनावट कपड्यांची विक्री होत असल्याची माहिती कंपनीतील अधिकारी राकेश सावंत यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार गुन्हे शाखेकडे दिली. गुन्हे शाखेच्या पथकाने वस्त्रदालनात छापा टाकला. या कारवाईत लिव्हाईस कंपनीच्या ११८ जीन, १५ शर्ट, २४ टीशर्ट असा चार लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ब्रॅँड काईड क्लोदिंग या वस्त्रदालनाच्या मालकाविरुद्ध काॅपीराइट ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा…केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ‘ स्वप्न ‘ कधी होणार पूर्ण ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक रंगराव पवार, सहायक निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक राजेश पाटोळे, संजीव कळंबे, विनोद भंडलकर, राकेश टेकावडे यांनी ही कारवाई केली.