प्रियकराने विवाहास नकार दिल्याने गर्भवती तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रियकरासह नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विनिता विक्रम सावंत (वय २४, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) असे आत्महत्या केलेल्या तरणीचे नाव आहे. याप्रकरणी प्रियकर संग्राम उर्फ पिट्या विलास पानसरे, त्याची आई, मावशी आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> पुणे: कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी पीएमपीची मोफत बससेवा
याबाबत विनिताच्या आईने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विनिता आणि आरोपी संग्राम यांचे प्रेमसंबंध होते. दोघांच्या कुटुंबीयांना प्रेमप्रकरणाची माहिती होती. दोघे विवाह करणार होते. दरम्यान, विनिता गर्भवती राहिली. त्यानंतर आराेपी संग्रामने तिच्यावर संशय घेतला. मूल माझे नसल्याचे सांगून तिचा छळ केला. संग्रामने विवाहास नकार दिल्यानंतर विनिताने पाच दिवसांपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन नुकतीच आत्महत्या केली. अंत्यविधी झाल्यानंतर तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. संग्राम, त्याची आई, मावशी आणि शेजारी राहणाऱ्या महिलेने विनिताचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.