पुणे : पुणे शहरातील वडगावशेरी भागात महापालिकेच्या माध्यमातून रस्ते,पाण्याची पाईप लाईन यासह अनेक काम अर्धवट करण्यात आली आहे.यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता.त्यावेळी नागरिकांनी अर्धवट कामांच्या निषेधार्थ,अर्धवट मुंडण करून पुणे महापालिका प्रशासनाचा त्यांनी निषेध नोंदविला.
यावेळी आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले,वडगावशेरी मधील कळस,धानोरी,जाधवनगर या भागात रस्ते,पाण्याची पाईप लाईन,स्ट्रीट लाईट ही काम अर्धवट करण्यात आली आहेत.तर अन्य मतदार संघात पुणे महापालिका प्रशासन पायाभूत सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.यामुळे समस्त ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जाव लागत आहे.
या समस्यांबाबत महापालिका आयुक्तांकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.त्या पार्श्वभूमीवर आज पुणे महापालिकेवर समस्या ग्रामस्थांसोबत धडक मोर्चा काढण्यात आला आहे.या आंदोलनाची दखल महापालिका आयुक्तांनी दखल न घेतल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन केले जाईल,असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला.
तसेच ते पुढे म्हणाले, वडगावशेरी भागातील प्रलंबित प्रकल्प मार्गी लागावे,या करिता पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.