सुविधांचा अभाव आणि वापरणाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे स्वच्छतागृहांत अस्वच्छता

कुठे आहेत ‘स्वच्छ’तागृहे?

condition of primary health centers in state is pathetic beds in rural hospitals are utilized only at 40 percent capacity
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय, ग्रामीण रुग्णालयांतील खाटांचा वापर केवळ ४० टक्के क्षमतेनेच
sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य
no water supply in most parts of Pune city on thursday due to repair works
पुणे : शहरात अघोषित पाणीकपात? पेठांचा भागवगळता उर्वरित शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
mumbai south central lok sabha constituency marathi news
आमचा प्रश्न – दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : प्रदूषण, आरोग्याचे प्रश्न मार्गी लागावे

घराबाहेर पडल्यावर स्वच्छतागृहाची गरज भासल्यास रस्त्यांवर ते शोधणे हे जिकिरीचे काम असते. स्वच्छतागृह सशुल्क असेल तर तिथे जाता येईल याची किमान शाश्वती असते. त्याऐवजी नि:शुल्क स्वच्छतागृह सापडले तर मात्र स्वच्छतागृह उपलब्ध झाल्याचा आनंदही वाटून घेण्यासारखी परिस्थिती नाही! शहरातील बहुसंख्य नि:शुल्क स्वच्छतागृहं ही सुविधांचा अभाव आणि वापरणाऱ्यांची बेपर्वाई अशा दुहेरी कारणांमुळे घाण आणि दुर्गंधीची आगारे झाली आहेत.

वैयक्तिक व वस्ती पातळीवर उभारल्या जाणाऱ्या शौचालयांमधील उच्चांकासाठी ‘स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत पुण्यास नावाजले गेले असले तरी सार्वजनिक स्वच्छतागृहांची मात्र शहरात वानवाच असल्याचे ‘लोकसत्ता’ने घेतलेल्या आढाव्यात समोर आले. ठरलेल्या निकषानुसार दर साठ व्यक्तींमागे सार्वजनिक स्वच्छतागृहातील एक ‘सीट’ उपलब्ध असणे आवश्यक मानले जाते. पस्तीस लाख लोकसंख्येच्या पुण्यात मात्र स्वच्छतागृहांच्या केवळ एकवीस हजार ‘सीट्स’ उपलब्ध आहेत, तसेच एकूण स्वच्छतागृहांपैकी चाळीस टक्केच स्वच्छतागृहे महिलांसाठी असल्याचे उघड झाले. या पाश्र्वभूमीवर सध्या आहेत त्या स्वच्छतागृहांमधील काही नि:शुल्क स्वच्छतागृहांची ‘लोकसत्ता’ने पाहणी केली. बहुतेक नि:शुल्क स्वच्छतागृहं कुणाला वापरताच येणार नाहीत इतक्या घाण अवस्थेत असल्याचे चित्र आहे.

अनेक नि:शुल्क स्वच्छतागृहांमध्ये पाणीच नसणे ही प्रमुख समस्या आहे. पाणी असले तरी पाणी टाकण्यासाठी प्लॅस्टिकचे डबे गायब असणे, किंवा पाणी सतत वाहतेच असणे, हेही या पाहणीत समोर आले. काही ठिकाणी पाणी उपलब्ध असूनही स्वच्छतागृहाचा वापर करणाऱ्या मंडळींना मात्र पाणी टाकण्याची गरज वाटत नसल्याचे दिसून आले. परिणामी नि:शुल्क स्वच्छतागृहांमध्ये भयंकर घाण आणि दुर्गंधी आहे. अनेक स्वच्छतागृहं अतिशय तुटपुंज्या व अरुंद जागेत आहेत. स्वच्छतागृहांमध्ये दिवे नसणे किंवा दिवे असूनही विजेची जोडणी नसणे, महिलांच्या स्वच्छतागृहांमध्ये कचरा टाकण्यासाठी कचऱ्याचे छोटे डबे उपलब्ध नसणे, स्वच्छतागृहांच्या दारातच घाण पाणी किंवा कचरा साचल्यामुळे आत जाताच न येणे अशी स्थिती बऱ्याच ठिकाणी बघायला मिळाली. अनेक स्वच्छतागृहे देखील सहजासहजी नजरेस पडणार नाहीत अशा ठिकाणी आहेत, तर काही ठिकाणी स्वच्छतागृहांवर मोठे फलक (होर्डिग) लावले गेल्यामुळे ती पटकन दिसत नाहीत. दुर्गंधीमुळेच आसपास स्वच्छतागृह असल्याची जाणीव होते.

पाहणीत काय दिसले?

* कुमठेकर रस्त्यावर ‘तथास्तू’ दुकानासमोरील महिला स्वच्छतागृहाचे बांधकाम बाहेरून चांगले दिसले तरी आत प्रचंड घाण होती. स्वच्छतागृहात आरसा आहे, दिवे मात्र नाहीत.

*  घोले रस्त्यावर क्षेत्रीय कार्यालयाशेजारील स्वच्छतागृहात असहनीय दरुगधी व घाण होती. पाण्याचा नळही गायब आहे.

*  खडकमाळ आळी मार्गावर मदर तेरेसा चर्चसमोरील स्वच्छतागृहाच्या दारातच कचऱ्याचा ढीग होता. घाणीमुळे या स्वच्छतागृहात कुणी जाऊ शकत नाही.

*  रमणबाग शाळेशेजारील महिला स्वच्छतागृह अत्यंत अरुंद जागेत आहे. स्वच्छतागृहात पाणी टाकण्यासाठी डबे नाहीत. विजेचे दिवेही नाहीत.

*  घोरपडी पेठेत निळू फुले तरणतलावासमोरील स्वच्छतागृहात पाणी सतत गळत असून स्वच्छतागृहात घाण आहे.

*  राष्ट्रभूषण चौकाजवळील पुरूषांच्या स्वच्छतागृहाच्या दारात पाणी व चिखलामुळे चिकचिक व घाण आहे.

*  विजय टॉकीज चौक, स. प. महाविद्यालय चौक तसेच गांजवे चौकातून पुढे गेल्यावर शास्त्री रस्त्यावर असलेल्या पुरुषांसाठीच्या स्वच्छतागृहांमध्येही दरुगधीच होती. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनाही त्या दरुगधीचा त्रास होतो.