पीक कर्ज वितरण, प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) आणि कृषी पायाभूत सुविधा निधी (ॲग्री इन्फ्रा फंड-एआयएफ) प्रकल्प प्रस्तावांना गती देण्यासाठी शुक्रवारी (१२ ऑगस्ट) खास शिबिर जिल्ह्यातील सर्व बँकांच्या शाखांमध्ये आयोजित करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

पुणे जिल्ह्यातील बँकांच्या विभागीय आणि प्रादेशिक व्यवस्थापकांची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. जिल्हा अग्रणी बँकेने सर्व बँकामध्ये प्रलंबित असलेल्या पीक कर्ज वाटप प्रस्तावांची तसेच पीएमएफएमई, एआयएफ अंतर्गतच्या प्रस्तावांचा आढावा सादर केला. या सर्व प्रस्तावांची छाननी करुन १२ ऑगस्टच्या शिबिरामध्ये सर्व पात्र प्रस्तावांना त्वरीत मंजुरी द्यावी. या कामामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि अधिनस्त कार्यालयांनी सहभाग घ्यावा. तसेच शिबिरानंतर त्वरीत याबाबतचा आढावा सादर करावा, अशा सूचना या वेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा अग्रणी बँक तथा महाराष्ट्र बँकेचे पुणे शहर क्षेत्रीय महाव्यवस्थापक राजेश सिंग, पुणे पूर्व क्षेत्रीय व्यवस्थापक अभिजित चंदा तसेच अन्य सदस्य बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रादेशिक व्यवस्थापक आदी उपस्थित होते.