पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भरतगावात पत्नीला जीवे मारण्याची धमकी देऊन तीन मित्रांना बायकोवर बलात्कार करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी पतीसह त्याच्या तीन मित्रावर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित महिला आणि तिचा पती भरतगावात राहायला असून २०२३ पासून आरोपी पतीने पत्नीला जीवे मारण्याची धमकी देऊन तीन मित्रांसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. पतीने जीवे मारण्याची धमकी दिल्याने मागील दोन वर्षांपासून पीडित महिला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करीत होती. पण काही केल्या त्रास थांबत नव्हता. त्यावर अखेर पीडित महिलेने आमच्याकडे तक्रार देताच, आरोपी पतीसह तीन मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणातील आरोपींना अटक करून चौकशी करण्यात येत असल्याचे यवत पोलिसांनी सांगितले.