scorecardresearch

खळबळजनक: प्रेमी युगलाला रिक्षात अश्लील चाळे करताना हटकले, प्रियकराने रिक्षा चालकाची केली हत्या

भोसरी पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला ठोकल्या बेड्या रिक्षात अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगलाला हटकले म्हणून रिक्षा चालकाची प्रेमी तरुणाने हत्या केली आहे. या घटनेमुळं दापोडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अलीम इस्माईल शेख वय- ४५ अस हत्या झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. आरोपी बाळासाहेब कांबळे वय- २८ भोसरी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सायंकाळी […]

rickshaw driver killed by lover
प्रेमी तरुणाने केली रिक्षा चालकाची हत्या ( Image – लोकसत्ता टीम )

भोसरी पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला ठोकल्या बेड्या

रिक्षात अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगलाला हटकले म्हणून रिक्षा चालकाची प्रेमी तरुणाने हत्या केली आहे. या घटनेमुळं दापोडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अलीम इस्माईल शेख वय- ४५ अस हत्या झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. आरोपी बाळासाहेब कांबळे वय- २८ भोसरी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सायंकाळी पाचच्या सुमारास पिंपरी- चिंचवडच्या दापोडीत ही खळबळजनक घटना घडली आहे.

हेही वाचा >>> कोरेगाव पार्क भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; चार परदेशी महिलांसह सातजणी ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी च्या गणेश नगर भागात पार्क केलेल्या रिक्षात आरोपी अमित हा त्याच्या प्रेयसीसोबत अश्लील चाळे करत होता. हे पाहून रिक्षा चालक इस्माईलने त्याला हटकले यावरून दोघांमध्ये वाद झाला. मग त्याने दगड आणि सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून रिक्षा चालक इस्माईलची हत्या केली. या घटनेमुळे दापोडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काही तासातच आरोपींना भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात प्रेयसीचा काही सहभाग आहे का या दिशेने देखील आम्ही तपास करणार आहोत अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 20:38 IST