पुणे : धनकवडी भागात टोळक्याने दहशत माजवून तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी बाबा मालुसरे, संकेत कसबे, सोहम सोनार यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नितेश विनोद गायकवाड (वय १८, रा. गोविंद पाटीलनगर, धनकवडी) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घरासमोर थांबला होता. त्या वेळी आरोपी मालुसरे, कसबे, सोनार हे दुचाकीवरून आले. त्यांनी गायकवाडला शिवीगाळ केली. आम्ही धनकवडीचे भाई आहोत, असे ते म्हणाले. त्यानंतर आरोपींनी गायकवाडवर काेयत्याने वार केला. गायकवाडने हातावर वार झेलण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात तो जखमी झाला. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहकारनगर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.