pune crime news Drug dealers caught on Shankarsheth road | Loksatta

पुणे : शंकरशेठ रस्त्यावर अमली पदार्थ विक्रेत्यांना पकडले; पावणे चार लाखांचे मेफेड्रोन जप्त

खडकी पोलीस स्थानकात आरोपींविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : शंकरशेठ रस्त्यावर अमली पदार्थ विक्रेत्यांना पकडले; पावणे चार लाखांचे मेफेड्रोन जप्त
शंकरशेठ रस्त्यावर अमली पदार्थ विक्रेत्यांना पकडले

पुण्यातील शंकरशेठ रस्त्यावर अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तिघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून तीन लाख ८६ हजारांचे २५ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

हेही वाचा- दुचाकी चोरट्यांना पकडले ; सहा दुचाकी जप्त

तालीब शकील अन्सारी (वय २३,रा.घोरपडे वस्ती, लोणीकाळभोर), आयान अल्ताफ बागवान (वय १९), वसीम आसिम सय्यद (वय १९, दोघे रा. भाग्योदय नगर कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकरशेठ रस्त्यावर तिघे जण अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेणयात आली. तेव्हा त्यांच्याकडे मेफेड्रोन सापडले.

हेही वाचा- नवरात्रोत्सवात फलकावर छायाचित्र न लावल्याने एकाला मारहाण; चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

अतिरिक्त पाेलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे, विशाल दळवी, मनोज साळुंके, पांडुरंग पवार, सचिन माळवे आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अजित पवार यांच्या उपस्थितीत थेरगावात सोसायट्यांचा मेळावा ; शहरातील सोसायट्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न

संबंधित बातम्या

“विक्रम गोखले तीन महिन्यांपूर्वी पोलीस ठाण्यात आले होते, तेव्हा…”, वरीष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितली ‘ती’ आठवण!
VIDEO: अभिनेते विक्रम गोखलेंची प्रकृती खालावली, रुग्णालयाची माहिती
विठू नामाच्या गजरात तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान!
घरभाडं मागण्यासाठी गेलेल्या घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरून ढकललं; पुण्यातील धक्कादायक घटना
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Gujarat Election 2022: अहमदाबादमधून अमित शाह नावाच्या व्यक्तीला भाजपाकडून उमेदवारी
‘म्हाडा’ची ४६७८ घरांसाठी पुढील आठवडय़ात सोडत 
वादग्रस्त ट्वीटप्रकरणी रिचा चड्ढाविरुद्ध कारवाईची तयारी; मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांकडून माहिती
कुमार सोहोनी आणि प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार
पालकांसाठी ‘बालभारती’ची उजळणी..