पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) प्रस्तावित केलेल्या वर्तुळाकार रस्त्यातील पश्चिम भागातील गावांचे भूसंपादन सुरू आहे. प्रकल्पासाठी आवश्यक जमीन मालकांना नोटीस पाठवून २१ ऑगस्टपर्यंत संमतीपत्रे देण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, नोटीसची मुदत संपुष्टात आल्याने मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील १३ गावांमधील स्थानिकांनी अद्याप संमतीपत्र दिलेले नाही. परिणामी भूसंपादनास विलंब होत आहे. या कारणास्तव जिल्हा प्रशासनाकडून सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी वर्तुळाकार रस्त्याबाबत भूसंपादन अधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रकल्पबाधितांना नोटीस पाठविल्यानंतर सामाईक क्षेत्र असल्याने परस्पर मतभेद, वाद, तसेच मृत्यू नोंद, वारस नोंद आणि त्यांची कागदपत्रांची उपलब्धता, सातबाऱ्यावरील नाव असलेल्या व्यक्ती परगावी असल्याने विलंब, जागा आणि क्षेत्रफळावरून असलेले कौटुंबिक वाद, कागदोपत्री न झालेले फेरफार अशा अनेक कारणांमुळे संमतीपत्र रखडले आहेत.

nagpur total 717 candidates in arena with fadnavis and bawankule
फडणवीस, बावनकुळे, केदार, देशमुखांसह २१७ रिंगणात
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Nana Patole question regarding the action to be taken against Rashmi Shukla
रश्मी शुक्लांना हटवण्यास एवढा वेळ का लागला? नाना पटोले यांचा सवाल
Loksatta sanvidhanbhan Powers of inquiry and suggestions to the Commission for Scheduled Castes and Tribes under Article 338
संविधानभान: मारुती कांबळेचं काय झालं?
whistle symbol open for bahujan vikas aghadi as well as for other in maharashtra assembly elections
विधानसभा निवडणुकीसाठी शिट्टी झाले खुले चिन्ह; बहुजन विकास आघाडी सह इतर अपेक्षांना शिट्टी चिन्ह मिळू शकणार
In yavatmal front of collectors office Shetkari Warkari Sangathan protested today while celebrated Black Diwali
यवतमाळ : काळी दिवाळी अन शिदोरी…, काय आहे नेमके प्रकरण जाणून घ्या
Gold and silver prices fell, Lakshmi Pujan, Gold price,
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीचे दर घसरले; असे आहेत आजचे दर
Discrepancy in teaching hours in RTE and State Syllabus
आरटीई, राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील अध्यापन तासांमध्ये विसंगती… झाले काय, होणार काय?

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडवर पाच हजार ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची नजर

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने १७२ किलोमीटर लांबी आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्त्याचे काम हाती घेत पूर्व आणि पश्चिम असे दोन भागात भूसंपादन करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामध्ये पूर्व भागात मावळातील ११, खेडमधील १२, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळातील सहा गावांचा समावेश आहे. राज्य सरकारकडून भूसंपादनाला गती देण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. त्यानंतर भूसंपादनाला वेग आला आहे. पश्चिम मार्गावरील मावळ तालुक्यातून सहा, मुळशी तालुक्यातील तीन आणि हवेली तालुक्यातील चार अशा एकूण १३ गावांतील स्थानिकांनी मुदतीनंतरही संमतीपत्र दिलेले नाही. त्यामुळे संबंधितांना नोटीस पाठवून सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : पुण्यात क्रिकेट विश्व चषकाची वाजतगाजत मिरवणूक, ‘सेल्फी’काढण्याचीही संधी, रोहित पवार म्हणाले…

‘वर्तुळाकार रस्त्याच्या पश्चिम मार्गावरील ३४ गावे बाधित होत असून भूसंपादनाबाबत स्थानिकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. गावांमध्ये निवाडा प्रक्रिया राबवून दर निश्चिती देखील करण्यात आली. त्यानुसार स्थानिकांना नोटीस पाठवून ३० जुलैपर्यंत संमतीपत्र देण्यासाठी मुदत दिली होती, त्याकरिता २१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील १३ गावातील स्थानिकांनी संमतीपत्र दिलेले नाही. पुढील भूसंपादनासाठी आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या स्थानिकांनी संमतीपत्र दिलेले नाही, त्यांना अंतिम नोटीस पाठवून सक्तीने भूसंपादन करण्यात येईल’, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : पुण्याला पुराचा धोका?… ही आहेत कारणे

सक्तीने भूसंपादन करण्यात येणारी गावे

मावळ : उर्से, पांदली, बेबेडहोल, धामणे, पाचाने आणि चांदखेड
मुळशी : केमसेवाडी, अंबडवेट आणि जवळ
हवेली : खामगाव, मांडवी, मोरलेवाडी आणि थोपटेवाडी