scorecardresearch

Premium

पुणे : रेल्वेची ‘दिवाळी’; उत्पन्नाची गाडी सुसाट…

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने नोव्हेंबरमध्ये उत्पन्नात मोठी वाढ नोंदवली आहे. रेल्वेने केवळ प्रवासी वाहतुकीतून सुमारे शंभर कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे.

Pune Division of Central Railway revenue
पुणे : रेल्वेची 'दिवाळी'; उत्पन्नाची गाडी सुसाट… (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने नोव्हेंबरमध्ये उत्पन्नात मोठी वाढ नोंदवली आहे. रेल्वेने केवळ प्रवासी वाहतुकीतून सुमारे शंभर कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. दिवाळीच्या काळात वाढलेल्या प्रवासी संख्येचा रेल्वेला फायदा झाला आहे. मागील महिन्यात पुणे विभागाला एकूण १४३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

रेल्वेच्या पुणे विभागाने नोव्हेंबर महिन्यात प्रवाशांच्या वाहतुकीतून ९९ कोटी ७६ लाख रुपयांचा महसूल मिळवला. तो मासिक उद्दिष्टापेक्षा ५.५ टक्के जास्त असून, मागील वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत ९.९ टक्के अधिक आहे. तिकीट तपासणीतून रेल्वेने ३ कोटी ९ लाख रुपयांचा महसूल मिळविला. मासिक उद्दिष्टापेक्षा तो २८.८ टक्के जास्त असून, मागील वर्षीच्या तुलनेत त्यात ५७.७ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

Railway mega block Many trains will be cancelled between Pune and Lonavala
रेल्वेचा मेगा ब्लॉक! पुणे -लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द राहणार 
Gautam Adani
गौतम अदाणी धारावीच्या कायापालटासाठी पूर्णतः तयार, आता फक्त फेब्रुवारीची प्रतीक्षा
accidents Samruddhi highway
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच, गुरुवारी पहाटे खासगी बसला कंटेनरची धडक
Mumbai-Pune Expressway closed
मराठा आंदोलकांची पदयात्रा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या दिशेची वाहतूक गुरुवारी बंद

हेही वाचा – पुणे: गॅलरीतून उडी मारून वृद्धाची आत्महत्या

पुणे विभागाला इतर व्यावसायिक मार्गाने ११ कोटी २५ लाख रुपयांचा महसूल मिळाला असून, मागील वर्षीच्या तुलनेत त्यात ३०.३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. पार्सलद्वारे २ कोटी ४६ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. पुणे विभागाने मागील महिन्यात एकूण १४३ कोटी ६९ लाख रुपयांचा महसूल मिळविला आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ. स्वप्नील नीला यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी करण्यात आली आहे.

हेही वाचा – ‘आरटीई’ कोट्यातून प्रवेशाच्या आमिषाने ५३ पालकांची फसवणूक; शाळेतील लेखापालाविरुद्ध गुन्हा

मालवाहतुकीतून ३१ कोटी

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने मागील महिन्यात मालगाड्यांची वाहतूक करून ३१ कोटी ११ लाख रुपये मिळविले आहेत. त्यात प्रामुख्याने वाहने, पेट्रोलियम पदार्थ आणि साखरेच्या मालगाड्यांची वाहतूक करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे यांनी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune division of central railway has reported a huge increase in revenue in november pune print news stj 05 ssb

First published on: 03-12-2023 at 21:27 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×