पुणे : कौटुंबिक न्यायालयातील वकिलांची संघटना असलेल्या ‘दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन’ची वार्षिक निवडणूक २७ जून रोजी होणार आहे. याच दिवशी मतमोजणी करण्यात येणार असून, निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

अध्यक्षपदासाठी ॲड. कल्पना निकम, ॲड. धनश्री पाटील आणि ॲड. प्रगती पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत. उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी सहा जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये ॲड. प्रथमेश भोईटे, ॲड. कविता दंडवते, ॲड. स्मिता देशपांडे, ॲड. संयोगिता पागे, ॲड. आशिष पुरोहित आणि ॲड. सुचित्रा राजे यांचा समावेश आहे. सचिवपदाच्या एका जागेसाठी ॲड. कोमल देशमुख आणि ॲड. विष्णू खरात यांनी अर्ज दाखल केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहसचिव पदासाठी ॲड. मंगेश कदम आणि ॲड. शारमेन लाजरस, तसेच खजिनदार पदासाठी ॲड. राहुल जाधव आणि ॲड. राहुल परदेशी यांनी अर्ज दाखल केले आहेत. कार्यकारिणीच्या पाच जागांसाठी ॲड. दिलीप राम, ॲड. प्रवीण गायकवाड, ॲड. संभाजी पांचाळ, ॲड. अमृता पवार, ॲड.प्रतीक्षा राठी, ॲड.अमोल उजनकर, ॲड. निलेश वाराणकर यांनी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. संतोष नायडू यांनी दिली.