पुणे : पुणे शहरातील नवले पुला जवळ 30 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एका भरधाव कारने रिक्षाला जोरात धडक दिली.त्या घटनेमध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.तर त्या रिक्षाचालकावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तर त्या अपघाताच्या घटनेमध्ये नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या मालकीची कार असल्याची माहिती पोलीस तपासातसमोर आली. त्यानंतर जखमी असलेल्या रिक्षाचालकाच्या कुटुंबीयासह अनेक संघटनांनी गौतमी पाटील यांना अटक करून कारवाई करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली.यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया येण्यास देखील सुरुवात झाली.
या घटनेला जवळपास आठ दिवसाचा कालावधी होत आला तरी देखील गौतमी पाटील यांनी त्यांची भूमिका मांडली नव्हती. त्या सर्व घडामोडी दरम्यान गौतमी पाटील यांचा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमानंतर गौतमी पाटील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधला असता त्या म्हणाल्या,ती कार माझी आहे.पण मी अपघाताच्या वेळी कारमध्ये नव्हते.मी हे अगोदर देखील सांगितले असून त्या अपघाताच्या घटनेच्या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही देखील तपासले आहे. मी यामध्ये दोषी नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.तरी देखील मला दोषी ठरविले जात आहे.त्यामुळे मी या गोष्टीकडे जास्त लक्ष देणार नाही.मी ज्या गोष्टीमध्ये नाही.त्या गोष्टीमध्ये मला पाडू नका,मला बर्याच गोष्टी करिता सगळे जण जाणीवपुर्वक ट्रोल करीत आहेत.त्यामुळे मला कोण काय म्हणतय,या गोष्टीकडे मी लक्ष देत नाही.त्यामुळे मी म्हणेल आणखी ट्रोल करा,अशी भूमिका त्यांनी मांडली.
तसेच त्या पुढे म्हणाल्या, त्या अपघातातील जखमी व्यक्ती आणि कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी माझे भाऊ गेले होते.आम्ही त्यांना मदतीचा हात पुढे केला होता.मात्र त्यांनी गुन्हा दाखल असल्याने,ती मदत नाकारली आहे.त्यामुळे आता यापुढे सर्व गोष्टी न्याय मार्गाने होईल,अशी भूमिका त्यांनी मांडली. भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना फोन करून आदेश दिले की,गौतमी पाटीलला उचलणार आहेत का नाही.त्या प्रश्नावर गौतमी पाटील म्हणाल्या,दादा जे बोलले हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.