पुणे: पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी क्रिकेटच्या मैदानात उतरून फटकेबाजी केली आहे. पुण्याच्या मावळ मधील चांदखेड येथे बारमुख क्रिकेट मैदानाचे त्यांच्या हस्ते उदघाटन झाले. कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी बॅट घेऊन चेंडू टोलावला. चंद्रकांत पाटील हे हू इज धंगेकर या वक्तव्यामुळे चांगलेच प्रकाश झोतात आले होते. कसबा पोटनिवडणूक जिंकणारे धंगेकर यांनी मीच धंगेकर असं उत्तरही पाटील यांना दिले होते.

आणखी वाचा- “प्रिय निलू बाळा, तू अत्यंत कळकळीने…”, निलेश राणेंच्या सुप्रिया सुळेंवरील ‘त्या’ टीकेला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे मावळ दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते क्रिकेट मैदानाचे उदघाटन, चांदखेड येथे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल आदेश पत्र त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्याअगोदर चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते क्रिकेट मैदानाचे उदघाटन झाले तिथे चंद्रकांत पाटील यांनी क्रिकेट ची बॅट घेऊन चांगलीच फटकेबाजी केली. ऐरव्ही, राजकीय सभांमधून विरोधकांना गुगली टाकणारे पाटील यांनी आज मात्र फलंदाजी करून चेंडू टोलावला आहे. आज देखील ते भाषणामधून विरोधकांवर काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.