पुणे : शहरात गणेशोत्सावाची धामधूम सुरू असताना गंगाधाम परिसरात मिसरूड फुटलेल्या तीन मुलांनी थेट दुकानात जाऊन एका व्यावसायिकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारात व्यावसायिक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिलीप बाळासाहेब गायकवाड (वय ४८) असे या गो‌ळीबारात जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तत्पूर्वी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तिघांना ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा…पुणे :वनराज आंदेकर खून प्रकरणातील २१ आरोपींवर मोक्का कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप गायकवाड यांचा वाळू, वीट तसेच बांधकामाचे साहित्य पुरविण्याचा व्यावसाय आहे. त्यांचे कात्रज कोंढवा रस्त्यावरून गंगाधामकडे जाणाऱ्या रस्त्यावर चोरडिया कॉर्नर येथे श्री दत्त सप्लायर्स नावाचे दुकान आहे. ते दुपारी दुकानात बसलेले होते. तेव्हा तिघे दुकानात आले. त्यांनी दिलीप यांना विटांचा भाव विचारला. त्यांनी तो सांगितला. मात्र, पुन्हा ते माहिती विचारू लागले. तेव्हा दिलीप यांनी त्यांना कामावरील मुलाला विचारण्यास सांगत उठून ते लघुशंकेला निघाले. त्याचवेळी अल्पवयीन मुलाने त्यांच्यावर एकापाठोपाठ तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्यांच्या पोटाला लागली. तर दोन गोळ्या सुदैवाने लागल्या नसल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली.

हे ही वाचा…गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पिंपरी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; पिंपरी, चिंचवडमधील वाहतुकीत ‘असा’ आहे बदल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोळाबार झाल्याची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी दिलीप यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तर पसार झालेल्या तीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.