राहुल खळदकर

पुणे : कायदा-सुव्यवस्था तसेच गंभीर गुन्हे घडण्याचे प्रमाण विचारात घेता पुणे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित ठरले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) अहवालात पुणे शहर ज्येष्ठ नागरिक, नोकरदार महिलांसाठी सुरक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत सर्वांत कमी गुन्हे घडत असल्यामुळे एनसीआरबीसीच्या यादीत कोलकाता हे सुरक्षित शहरांच्या यादीत पहिल्या, तर मुंबई सहाव्या स्थानावर आहे.

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
Best Coworking Spaces in Pune
कार्यालयीन जागा सहकार्यात पुणे देशात आघाडीवर

‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार २०२१ मध्ये पुणे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. या अहवालात कोलकाता हे देशातील पहिले क्रमांकाचे सुरक्षित शहर असल्याचे म्हटले आहे. कोलकात्यात दखलपात्र गुन्ह्यांची (काॅग्निजिबल ऑफेन्स) संख्या प्रतिलाख लोकसंख्येमागे १०३.४ टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावर पुणे शहर असून एक लाख लोकसंख्येमागे गु्न्ह्यांची संख्या २५६.८ आहे. हैदराबाद देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर आहे. तेथील गुन्ह्यांची संख्या २५९.९ एवढी आहे. पुणे पोलिसांनी गेल्या काही वर्षांपासून महिला, महाविद्यालयीन तरुणी तसेच ज्येष्ठ नागरिकाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

हेही वाचा… देशात हवेत उडणारी बस कधी सुरू होणार? नितीन गडकरी म्हणाले…

ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच महाविद्यालयीन तरुणी, शाळकरी मुलींसाठी बडी काॅप, पोलीस काका, पोलीस दीदी, दामिनी पथक अशा योजना राबविण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला असून शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे. महिला, विद्यार्थिनी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी आल्यास त्वरित सोडविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील संघटित गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी गुंड टोळ्यांच्या विरोधात कारवाई केली आहे. सराइतांच्या विरोधात सातत्याने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याने गुंडांना चाप बसला आहे. महिला, विद्यार्थिनी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितेतस सर्वोच्च प्राधान्य देऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचे आदेश पोलीस आयुक्त गुप्ता यांनी दिले आहेत.

देशातील सुरक्षित शहरे – गुन्ह्यांची संख्या

कोलकाता – १०३.४

पुणे – २५६.८

हैदराबाद – २५९. ९

कानपूर – ३३६.५

बंगळुरु – ४२७.२

मुंबई – ४२८.४

हेही वाचा… रचण्यात आलेला सलमान खानच्या हत्येचा कट; लॉरेन्स बिश्नोई टोळीने मुंबईत येऊन रेकी केल्याचा पंजाब पोलिसांकडून खुलासा

दिल्लीच्या तुलनेत मुंबई सुरक्षित

देशातील आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर दिल्लीच्या तुलनेत सुरक्षित शहर ठरले आहे. देशातील पाच सुरक्षित शहरांमध्ये दिल्लीचा समावेश नसून मुंबई प्रतिलाख लाेकसंख्येमागे गुन्हे घडण्याचे प्रमाण ४२८.४ टक्के आहे.

सुरक्षित पुणे

पुणे शहरात माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत. निवृत्तीनंतर अनेक जण पुण्यात स्थायिक होण्यास प्राधान्य देतात. वाहतूक, दळणवळण या सुविधांमध्ये पुणे उणे असले, तरी कायदा सुव्यवस्था आणि गुन्हेगारीचे प्रमाण विचारात घेता पुणे देशातील सुरक्षित शहर मानले गेले आहे. नोकरदार महिला, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने पुणे देशातील अन्य शहरांच्या तुलनेत खूप सुरक्षित आहे. अगदी रात्री-अपरात्री नोकरदार महिला पुण्यातून सुरक्षित प्रवास करू शकतात.

एनसीआरबीच्या अहवालात पुणे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. पुणे पोलिसांनी गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्याचे सातत्याने प्रयत्न केल्याने हे यश मिळाले आहे. नोकरदार महिला, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने पुणे सुरक्षित आहे. – अमिताभ गुप्ता, पुणे पोलीस आयुक्त