पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोन आरोपींविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. अपघात प्रकरणातील अल्पवयीनांच्या रक्ताच्या नमुन्यात बदल करुन पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपीविरुद्ध २४२ पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले.
आदित्य अविनाश सुद (वय ५२ वर्षे, रा. बंगला क्रमांक ३, सोपानबाग सोसायटी, घोरपडी), आशिष सतीश मित्तल (वय ३७, रा. बेलवेडर सोसायटी, विमााननगर) अशी आरोपींची नावे आहे. अल्पवयीनांच्या रक्ताच्या नमुन्यात बदल करुन पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी विशेष न्यायालयात २४२ पानी आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात १७ साक्षीदारांचे जबाब नोंदवून जोडण्यात आले आहेत.

हेही वाचा : पुणे: प्रचार फेरीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, संगमवाडीतील घटना

Two children killed by mother over family dispute in Swami Chincholi village of Daund taluka Pune
कौटुंबिक वादातून दोन मुलांची आईकडून हत्या; संगणक अभियंता पतीवर कोयत्याने वार
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
pune koyta attack news
पुणे : बिबवेवाडीत तोडफोड करणाऱ्या आरोपीविरुद्ध आणखी एक गु्न्हा, तरुणावर कोयत्याने वार
CSR Scam
निम्म्या किमतीत मिक्सर, स्कूटर देण्याचे आमिष दाखवून २६ वर्षीय तरुणाने केली २० कोटींची फसवणूक
accident with Cattle smuggling truck 35 animals killed
गोवंश तस्करी करणाऱ्या ट्रकला अपघात… ३५ जनावरे दगावली…
kawad village bhiwandi wada road theft attempt failed
बंगल्यात चोरी करण्यासाठी चोरट्यांची टोळी जीपगाडीने आली पण मार खाऊन गेले
Biker dies in car collision in Deccan Gymkhana area Pune news
डेक्कन जिमखाना भागात मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
Biker dies in accident on Gultekdi flyover Pune news
पुणे: गुलटेकडी उड्डाणपुलावर दुचाकीस्वाराचा मृत्यू

येरवड्यातील कल्याणीनगर भागात १९ मे राेजी भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मोटारचालक अल्पवयीनाबरोबर मोटारीत त्याचे दोन मित्र होते. अगरवालचा मुलगा, त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांनी मद्यप्राशन केले होते. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालायत तिघांच्या रक्ताच्या नमुन्यात बदल करण्यात आले होते. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, त्याची पत्नी, शिवानी, अरुणकुमार सिंग यांनी ससूनमधील डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळानोर यांच्याशी संगनमत करुन रक्ताचे नमुने बदलल्याचे तपासात उघड झाले होते. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात गु्न्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेला आरोपी अरुणकुमार देवनाथ सिंग याचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालायने नुकताच फेटाळून लावला. त्यानंतर सिंग पोलिसांना शरण आला. रक्ताचे नमुने बदल प्रकरणात आरोपी आदित्य सूद आणि आशिष मित्तल सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर पाेलिसांनी त्यांना अटक केली होती.

Story img Loader