पुणे : बंद सदनिकेचे कुलूप कापून चोरट्यांनी पाच हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा १० लाख ७५ हजारांचा ऐवज चोरून नेला. त्याचबरोबर सोसायटीच्या कार्यालयातील सीसीटीव्ही आणि डीव्हीआरही चोरून नेला. ही घटना ३ ते ४ जूनदरम्यान कोंढव्यातील सुखसागरनगर भागात घडली असून, याप्रकरणी ५९ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोंढव्यातील सुखसागरनगरमधील कमल रेसिडन्सी येथे राहतात. त्या ३ आणि ४ जूनला परगावी गेलेल्या असताना सदनिका बंद होती. चोरट्यांनी ही संधी साधून सदनिकेचे कुलूप कापून आतमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा १० लाख ७५ हजारांचा ऐवज चोरून नेला. गावाहून आल्यानंतर महिलेला चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात तपास करीत आहेत.