Pune Lok Sabha Election 2024 Results Updates पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालात जिल्ह्यातील चार मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीला संमिश्र यश मिळाल्याचे चित्र पहिल्या काही फेऱ्यांतून पुढे आले आहे. महायुतीचे पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, मावळमधील श्रीरंग बारणे यांनी आघाडी घेतली असून महाविकास आघाडीच्या बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. सुळे आणि डॉ. कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत.

पुण्याची लढत अटीतटीची होईल अशी शक्यता होती. पुण्याचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यापुढे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे आव्हान होते. मात्र मोहोळ यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली. मावळमधील लढत ही शिवसेना विरोधात शिवसेना अशीच होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघिरे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना कडवी लढत देतील अशी शक्यता होती. मात्र बारणे यांना मताधिक्य असल्याने कल महायुतीच्या बाजूने दिसत आहे.

हेही वाचा…2024 Lok Sabha Election Result Live Updates बारामतीमध्ये अजित पवारांना धक्का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी पहिल्या फेरीपासून प्रतिस्पर्धी उमेदवार सुनेत्रा पवार यांना मागे टाकले. मात्र सुळे यांची आघाडी कमी जास्त होत असल्याने निकालाबाबत उत्सुकता कायम राहिली आहे. शिरूरचे विद्यामान खासदार डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर असून कोल्हे यांचे मताधिक्य १० हजारांपर्यंत पोहोचले आहे.