पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू केली आहे. त्यामुळे आता नागरिकांना दहा प्रकारची कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या मिळणार आहेत.

या प्रणालीनुसार इमारत बांधकाम परवाना, भोगवटा प्रमाणपत्र, हद्दींचा नकाशा, जमीन मालमत्तेतील कामांसंदर्भात भूखंडांचे वाटप किंवा हस्तांतरण, ना हरकत प्रमाणपत्र आदी कागदपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या कागदपत्रांसाठी नागरिकांना औंध किंवा आकुर्डीच्या कार्यालयांमध्ये जावे लागत होते.

या ऑनलाइन प्रणालीत अर्जदाराने अर्ज केल्यानंतर मोबाइल क्रमांकावर संदेश मिळेल. यामुळे नागरिकांना कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही. संबंधितांना फाईल कोणत्या टेबलवर आहे, हे समजणार आहे. अर्जात त्रुटी असल्यास अर्जदाराला संदेश पाठविला जाणार आहे. https:// www. pmrda. gov. in या संकेतस्थळावर सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार ई-ऑफिस प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे. एक फेब्रुवारीपासून या ऑननलाइन सुविधेला सुरुवात करण्यात आली आहे. – डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए

ही कागदत्रे मिळणार

● इमारत बांधकाम परवानगी

● जोता मोजणी प्रमाणपत्र

● भोगवटा प्रमाणपत्र

● झोन दाखला

● भाग नकाशा

● गृहयोजनेतील सदनिकांचे हस्तांतरण

● गृहयोजनेतील सदनिकांवर वारस नोंदणी

● सदनिकांवर कर्जासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे

● प्राथमिक अग्निशमन ना हरकत दाखला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● अंतिम अग्निशमन ना हरकत दाखला