पिंपरी- चिंचवड: पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर ३० प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. कोल्हापूर वरून मुंबई च्या दिशेने निघालेली खासगी प्रवासी बस चा अपघात होऊन भीषण आग लागली. ही घटना पहाटे पाच च्या सुमारास घडली आहे. सुदैवाने बस मधील ३० प्रवासी सुखरूप आहेत. या प्रकरणी शिरगाव पोलिसांनी खासगी प्रवासी बस चालक वर्षिकेत प्रल्हाद बिराजदारला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे पाच च्या सुमारास किलोमीटर ७८ येथे खासगी प्रवासी बस चा अपघात झाला. कोल्हापूर वरून मुंबई च्या दिशेने निघालेल्या बस वरील चालक वर्षीकेत ने वाहनाला ओव्हरटेक करत असताना बस वरील ताबा सुटला आणि महामार्गावरील संरक्षण पत्र्याला तोडून बस खाली गेली. बस मधील ३० प्रवासी जखमी झाले नाहीत. ते खाली उतरल्यानंतर बसला भीषण आग लागली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुदैवाने तीस प्रवासी अगदी थोडक्यात बचावले आहेत. घटनास्थळी वडगाव अग्निशमन दल, तळेगाव दाभाडे अग्निशमन दल, एमएसआरडीसी आदी घटनास्थळी दाखल झाले होते. आग आटोक्यात आणली आहे. आगीत बस जळून खाक झाली आहे. हलगर्जीपणा करणाऱ्या खासगी बस चालकाला शिरगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.